HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची बाधा

मुंबई | महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आज (२४ मे) मिळाली आहे. हा मंत्री काँग्रेसचा ज्येष्ठ नेता असून ठाकरे सरकारमध्ये हा मंत्री अत्यंत महत्वाचे खाते सांभाळतात. मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची समजल्यावर एकच खळबळ उडाली आहे. सध्या नेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंत्री होम क्वारंटाईन आहे. कॅबिनेटमध्ये मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे ठाकरे सरकारमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कशी आटोक्या नियंत्रणात आण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना झाल्यामुळे त्या मंत्र्यांवर काही दिवस रुग्णालयात सुरू होते. हा मंत्री कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संथ लसीकरणामुळे डेल्टा विषाणूचा धोका कायम’

News Desk

भिवंडीहून गोरखपूरला जाणारी श्रमिक ट्रेन रवाना

News Desk

देशात एकाच दिवसात ४ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ४ हजारांहून अधिक मृत्यू

News Desk