HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

देशातील ‘हे’ पहिले राज्य झाले ‘कोरोनामुक्त’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

पणजी | देशात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसऱ्याबाजुला देशातील गोवा हे पहिले राज्या कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंंत्रालयाने आज (१९ एप्रिल) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात एकही नवीन रुग्ण न सापडल्यानं गोवा ‘करोनामुक्त’ झाल्याची माहिती ट्वीटरद्वारे दिली आहे.  गोवा हे पर्यटनासाठी येणाऱ्यांची  संख्या जास्त आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘समाधान आणि सुटकेची बाब म्हणजे, गोव्यातील शेवटचा करोनाबाधित रुग्णचाह चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफचे यासाठी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. गोव्यात ३ एप्रिलनंतर कोणताही नवा करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही’, असे ते म्हणाले आहे. त्याशिवाय तीन एप्रिलपासून एकही नवीन रुग्ण गोव्यात आढळला नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

गोव्यात पहिला कोरोना रुग्ण १८ मार्चला दुबईहून परतलेल्या एका व्यक्तीला लागण झाली आहे.  ३ एप्रिलपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ७ वर होती. त्यानंतर राज्यात कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही. १५ एप्रिलपर्यंत राज्यातील सहा करोनाबाधित रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले होते आणि आज शेवटच्या रुग्णाचीही चाचणी निगेटिव्ह आल्याने इथल्या गोव्यातील नागरिकांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे.

 

Related posts

रामदास आठवलेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट

अपर्णा गोतपागर

दिव्यांगांकडून नाकर्त्या शिवसेना-भाजप सरकारला बांगड्यांचा आहेर – दिव्यांग सेना

News Desk

कंगणासाठी आता अमृता फडणवीस मैदानात ! अमृता वहिनी म्हणतात…

News Desk