HW News Marathi
Covid-19

मुंबईत कोरोनाची लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, पालिका समिती स्थापन करत तपास करणार

मुंबई | देशात, महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. मुंबईत ही कोरोना लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. जोगेश्वरीतील एका खासगी रुग्णालयात कोविडची लस टोचून घेतल्यानंतर काही तासांतच ६८ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लस घेतल्यानंतर झालेला मुंबईतील हा पहिलाच मृत्यू आहे. या जेष्ठ नागरिकांचा मृत्यू कसा झाला याची तपासणी करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने वैद्यकीय तज्ज्ञांची एक समितीनियुक्त केली आहे. याबाबतचा तपास करून ही समिती आपला अहवाल देईल.

८ मार्चला मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील मिल्लत नर्सिग होममध्ये एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दुपारी साडेतीनच्या सुमारास कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा देण्यात आली. ही लस दिल्यानंतर काही मिनिटांत ते बेशुद्ध होत खुर्चीतून खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा संध्याकाळी मृत्यू झाला.

मृत्यू पावलेल्या या जेष्ठ नागरिकाला अनेक प्रकारचे आजार होते, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. या जेष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर नियुक्त करण्यात आलेली तज्ज्ञ वैद्यकिय समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ही समिती मृत्यू बाबतचे सखोल विश्लेषण करणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट कोविड स्थितीचा आढावा, आदिवासीबहुल भागात लसीकरणाचे आव्हान!

News Desk

चिंता कायम ! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा २५ हजारांच्या पार

News Desk

दिलासादायक ! राज्यात १०,२२१ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk