नवी मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४वा वर्धापन दिन आज (९ मार्च) पार पडला आहे. हिंदुत्वाची कास धरल्यानंतर मनसेचा हा पहिला वर्धापन दिन सोहळा आहे. यावेळी मनसेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटीची घोषणा करण्यात आली आहे. “वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती केली आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मात्र, सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती केली आहे सरकारने चांगले काम केले तर त्यांना अभिनंदन केले पाहिजे,” असेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनसेच्या निवडणुकीमधील अपयशावर राज ठाकरे म्हटले की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खाते देखील उघडता आले नाही, जर देशात ५० ते ६० वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसची आजची अवस्था दयनीय आहे. यशाला बाप्प खूप असतात आणि अपयशाला सल्ले देणार खूप असतात, त्यांनी मी सल्ला देत की, तुम्ही माझी चप्पल घालून बघा की पक्ष चालून दाखवा, अशी खोटक टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. येत्या गुडीपाडव्याला सर्व मुद्द्यांवर बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.”
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्तवाचे मुद्दे
- ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत
- कांना कामे हवी आहेत का हेच कधी-कधी कळत नाही
- सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती केली आहे
- मला जे काही प्रश्न मांडायचे ते मी येत्या २५ गुढीपाडव्याला मांडणार आहे
- जनता खरेच विकासावर मत देते का, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
- यशाला बाप्प खूप असतात आणि अपयशाला सल्ले देणार खूप असतात, त्यांनी मी सल्ला देत की, तुम्ही माझी चप्पल घालून बघा की पक्ष चालून दाखवा
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खाते देखील उघडता आले नाही, जर देशात ५० ते ६० वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसची आजची अवस्था दयनीय आहे
- आपण महाराष्ट्रातील जनतेला बांधीत आहेत
- पत्रकारांनी कौतुकही खूप केले तर काही जणांनी बोचरी टीकाही खूप केली
- मनसेच्या १४ वा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- सरकारने चांगले काम केले तर त्यांना अभिनंदन केले
- केवळ वाभाडे काढू नका, चांगले काम केले तर आपण कौतुक करा,
- वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेटची निर्मिती केली आहे
मनसेचे असे आहे शॅडो कॅबिनेट
- सार्वजनिक बांधकाम – सामाताई शिवलकर,संजय शिरोडकर
- रोजगार हमी – बाळा शेंडगे, आशिष पूरी,
- सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर,
- कृषी – संजीव पाखरे, अजय कदम,
- कौशल्य विकास – स्नेहल जाधव
- महिला बालविकास – शालिनी ठाकरे
- मत्सविकास – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड
- अन्न व नागरी पुरवठा – महेश जाधव, विशाल पिंगळे
- सहकार – कोस्तूप लिमये, वल्लभ चितळे
- सार्वजनिक आरोग्य – रिटा गुप्ता
- नगरविकास – संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप कुलकर्णी, फारूक डाळा
- कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
- शालेय – अभिजीत पानसे, अदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर आणि अमोल रोगो
- ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर
- आपत्ती मदत – संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिष सारस्वत, संचोष धूरी, ललित यावलकर
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.