HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस मुख्यालयात धनंजय मुंडेंसमोर; बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीड | देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. बीडमध्ये पोलीस मुख्यालयात झेंडावंदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यास रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बीड शहरातील पंचशील नगर रस्त्याचे बोगस काम झाल्याची तक्रार करून देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अन् झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली असून मंत्री धनंजय मुंडेंनी याची दखल घेतली आहे.

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर विचित्र अपघात! सहाजण गंभीर जखमी ते म्हणाले, की कोणताही रस्ता एका व्यक्तीसाठी नसतो, त्यांनी चौकशीचे पत्र दिले असते तरी चौकशी केली असती. त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू.विशेष म्हणजे ट्राय पार्टीकडून देखील चौकशी करू, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दयावर सलग तिस-या दिवशी ही कामकाज ठप्प

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग, पवारांच्या जवळचे मंत्री भेटीला

News Desk

नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढण्याचं शिवसेना आमदाराचं विधान!

News Desk