HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक ! मुंबईमध्ये ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३३५ वर गेली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १८१ वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यात आता चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात ३ दिवसांच्या बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही महिला २६ मार्च रोजी डिलिव्हरीसाठी चेंबूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाली होती.

कोरोना रुग्णाच्या बाजूचा बेड डिलिव्हरीसाठी गेलेल्या महिलेला दिल्याचा आरोप तिच्या पतीने रुग्णालयावर केला आहे. त्यामुळे बाळ आणि आईला कोरोनाची लागण झाली. यासंदर्भातील माहिती महिलेच्या पतीने एक व्हिडिओ बनवून तो फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याप्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे. सध्या बाळ आणि आईवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वानखेडेंसह नवाब मलिकांचीही न्यायालयीन चौकशी करा, प्रसाद लाड यांची मागणी

News Desk

जर आपण कवडीमोलाची किंमत नसलेल्या नातवाचं ऐकलं असतं तर…अतुल भातखळकरांचे पवारांना प्रत्युत्तर

News Desk

जालन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण, जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात

News Desk