HW News Marathi
Covid-19

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या इंदापूरमधील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

इंदापूर | पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये कोरोनाने पहिला बळी घेतला असून भिगवण येथील त्या कोरोनाग्रस्त महिलेचा कोरोना महाराक्षसाने गळा घोटला आहे. आज (३० एप्रिल) सकाळी उपचाराने दरम्यान मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मंगळवार (२८एप्रिल ) रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भिगवण स्टेशन परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. या महिलेच्या रुपाने कोरोनाने इंदापूर तालुक्यात शिरकाव केला होता. एका ६५ वर्षे वयाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या कोरोनाची लागण झालेल्या महिलेला उपचारासाी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज सकाळी साधारण दहा वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे.

मात्र, असे असले तरी या महिलेवर भिगवण परिसरात ज्या डाॅक्टरांनी उपचार केले होते. ते डाॅक्टर व एका लॅबोरेटरी मधील पॅथोलाॅजिस्ट यांनी कोरोना चाचणी केली होतीत. यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे एक प्रकारचा दिलासा इंदापूरकरांना मिळालेला आहे. मात्र, अद्यापही उर्वरित सहा नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी असल्याने थोडी चिंता वाटत आहे.

तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे त्या कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील तिचा मुलगा, सुन व दोन नातवंडे यांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण अठ्ठावीस नागरिकांपैकी चोवीस जनाचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतले होते. व यापैकी अठरा व्यक्तींची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. तर स्वॅब घेतलेल्या सहा नागरिकांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

News Desk

छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये मद्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

News Desk

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २०० च्या वर पोहोचली

News Desk