मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या जागेच्या वादावर तोडगा काढला आहे. कांजूरमार्गमधील जागेवर मेट्रो कारशेड उभे राहणार आहे. त्यांच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही लढा दिला होता. दरम्यान आज मंत्री आदित्य ठाकरेंनी कांजूरमार्गमधील नव्या जागेची पाहणी केली. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
“कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएकडे सोपवण्यात आलेल्या जागेवर आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, एमएमआरडीए, एमएमआरसीएल अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. सुधारित योजनेसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेट्रो ३ आणि ६ ची कारशेड येथे उभारली जाणार आहे. मातीचं परीक्षण आधीच सुरु झालं आहे. जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांच्यासोबत उपस्थित होतो”, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.
This morning, officials of CMO, MMRDA, MMRCL visited the Kanjurmarg plot handed over to MMRDA for the car depot. Metro line 3 & 6 car depots will be made here and increase connectivity with the revised plan. Soil testing has begun already. I joined them to see the plot. pic.twitter.com/lpUDMy2TFN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.