मुंबई | कोरोनावर मात करुन मुंबईतील वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या आई म्हणजेच रश्मी उध्दव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. आता बरं होत आदित्य ठाकरे पुन्हा रुजू झाले आहेत.
दरम्यान, सध्याची मुंबईतील वाढती कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पाहता वरळी मतदारसंघातील नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० बेड्स तर पोद्दार रुग्णालयात २२४ बेड्सचं अद्यावत सोयीसुविधा असलेलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये जवळपास ७० टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे.
आदित्य ठाकरे राजकारणावर बोलायला विसरले नाहीत. “कोराना काळात जे राजकारण सुरु आहे, ते सुरु राहू द्या, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.” एवढंच नव्हे तर “लसीवरुन जे काही सुरु आहे त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही,” असं वक्तव्य त्यांनी केलं. “लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन,” असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
वरळीत उभारले जॅम्बो कोविड सेंटर
वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) इथल्या विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील बेड्सची क्षमता देखील ५०० वरुन वाढवून ती आता ८०० इतकी करण्यात येत आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे नेहरु विज्ञान केंद्र, पोद्दार रुग्णालय आणि एनएससीआय मिळून एकूण ११७५ बेड्स उपलब्ध होऊन कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सोय होणार आहे. नेहरु विज्ञान केंद्रातील कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मुंबई महापालिकेला नयन समुहाने मोठी मदत केली आहेे.
आज मुंबईच्या महापौर @KishoriPednekar जी यांच्या हस्ते व व्ही सीच्या माध्यमातून माझ्या उपस्थितीत वरळी येथील पोद्दार रूग्णालयात १९३ खाटांचे सीसी-१ व सीसी-२ कोविड समर्पित विभागाचे तसेच नेहरु सायन्स सेंटर येथील १५० बेड्सच्या रुग्णालयाचे लोकार्पण केले. pic.twitter.com/0bXsJh5O4G
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 12, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.