HW News Marathi
महाराष्ट्र

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात

मुंबई | बॉलिवूडमध्ये लग्न तुटणं, पुन्हा नातं जुळणं हे सुरुचं असतं. अशीच एक घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची बायको किरण राव यांचा घटस्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिर खान आणि किरण राव यांचे १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या घटस्फोटाची बातमीने मोठा धक्काच बसला आहे.

 

दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. एक कपल म्हणून सा-यांचे ते फेव्हरेट बनले होते. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेले नाही. किरण रावसहआमिर खानचे दुसरे लग्न होते.घटस्फोट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल असे आमिर खानने सांगितले आहे.

दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचं ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार? का भडकल्या निर्मला सीतारामन

Manasi Devkar

आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

swarit

वकील गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ‘या’ कारणामुळे घेतले ताब्यात

Aprna