मुंबई | राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. विरोधी पक्षांचे नेते, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून लॉकडाउनला विरोध होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींनी लागू केलेल्या लॉकडाउनवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“एका वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहित नव्हता. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.
मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला!
आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत..रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मारतेव्हा मा.मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत
मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 13, 2021
आज एका वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असं बरंच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच “हुशार” सत्ताधारी लॉकडाउन शिवाय पर्याय नाही, असं सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही किंवा लॉकडाउनला विरोधही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा!,” असंही शेलार यांनी म्हटलं आहे.
आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे
तेव्हा महाराष्ट्रातील तेच "हुषार" सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतातआम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही,कारण जनतेचा जीव महत्वाचा!
2/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 13, 2021
“मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारनं रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहोचवली. धान्य, निवारा दिला! आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत… रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?,” अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.
एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता.. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती,
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला
त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 13, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.