HW News Marathi
महाराष्ट्र

याकुब मेननच्या घरात बीएमसी घुसली नाही मात्र कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली – आशिष शेलार

मुंबई | “अभिनेत्री कंगना राणावतच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत होते, तर इतकी वर्ष कारवाई का झाली नाही, याकूब मेमनच्या घरावर कारवाई केली नाही, पण कंगनाला नोटीस दिल्यावर अवघ्या २४ तासात झालेली कारवाई ही सूडबुद्धीने आहे” असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. “मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी” या नवीन योजनेप्रमाणे ठाकरे सरकार काम करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला आहे.

“मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी करायची झाल्यास ती खूप मोठी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या वांद्रे स्थानकाशेजारील बहुमजली झोपडपट्ट्याही अनधिकृत आहेत. मग त्यावर कारवाई का झाली नाही? भाजप उद्यापासून महापालिकेला मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी पाठवेल, आणि त्यांच्यावर २४ तासात कारवाई होते का, याचा पाठपुरावा करेल” असे आवाहन शेलारांनी दिले आहे.

 

 

“ज्या बॉम्बस्फोटच्या साखळीने मुंबई हादरली त्या याकूब मेमनच्या घरात बीएमसी घुसली नाही, याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या माणसाला पालकमंत्री केलं, ज्यांनी कसबला बिर्याणी खाऊ घातली त्या काँग्रेसला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही.“सुडाच्या भावनेने ही कारवाई होताना दिसत आहे. अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे. कंगनाच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत असेल, तर जशी तत्परता तोडकाम करताना दाखवली, तीच भूमिका इतरांच्या बाबतीतही असायला हवी” असे शेलार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ए तू चूप”, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना दमदाटी

News Desk

अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला, शालिनीताई पाटलांचा आरोप

News Desk

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Aprna