औरंगाबाद | औरंगाबादच्या नामांतरावरुन राज्याचे राजकीय वातावरण प्रचंड तापलेले दिसत आहे. प्रमुख विरोधपक्ष असलेल्या भाजपनेही महाविकास आघाडी सरकारला या मुद्यावरुन कोंडीत पकडले आहे. आता औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज (२ जानेवारी) मराठा आंदोलकांचा रोष दिसून आला. मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून शनिवारी औरंगाबादेत आक्रमक आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली. तसेच या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही मराठा आंदोलकांनी निषेध केला आहे. आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आता हा नामांतराचा मुद्दा कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?
राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.