HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधकांनी स्वतःचे वजन केंद्र सरकारकडे वापरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी-अब्दुल सत्तार

बीड | विरोधकांना निवडणुकीचा जसा अंदाज आला नाही तसा हवामान खात्याचा अंदाज येत नाही असा टोला शिवसेनेचे महसूल,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना लगावला. ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथे शेतकऱ्यांच्या कापूस पिकांच्या पाहणी करताना बोलत होते

विरोधकांच्या टीकेवर पुढे बोलताना म्हणाले की, “आणखी दोन दिवस पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे त्यामुळं आणखी नुकसानीची शक्यता आहे. नंतरच संपूर्ण नुकसानी चा अंदाज येईल. त्यामुळे करण्यासाठी उशीर झाला नाही”, असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

“तर विरोधकांनी स्वतःचे वजन केंद्र सरकारकडे वापरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे आश्वासने देत आहे त्याबाबत विचार करावा. विरोधकांना शेतकऱ्याचे देणेघेणे नाही मुख्यमंत्री महोदयांच्या स्पष्ट सूचना आहेत प्रत्येक शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना नुसकान भरपाई देण्या बाबत सरकार कटिबद्ध आहे.मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बाबतीत तळमळीने काम करणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले प्रत्येक शेतकऱ्याला नुसकान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांने खचून जाऊन नये”, असा धीर देखील अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेत अमोल कोल्हे राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या बरोबरीने काम करणार ?

News Desk

बुद्धिबळ ऑलिंपियाड संयुक्त विजेत्या भारतीय संघाचंअजित पवार यांच्याकडून अभिनंदन

News Desk

थकीत वीजबिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत होणार!

News Desk