HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचीही स्वबळाची तयारी सुरु आणि भविष्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील – अब्दुल सत्तार

जालना | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढलण्याचं म्हटलं. इतकंच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री होण्याचीही इच्छा बोलून दाखवली. या दोन्ही वक्तव्यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, नगर परिषद निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने निवडणूक कशी लढायची हा त्यांचा प्रश्न असून आमचीही पालिका निवडणूक स्वबळावर लढायची तयारी सुरु असल्याचं सत्तार यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसला मुख्यमंत्री पद हवं असेल तर त्यांना सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील मात्र भविष्यात देखील शिवसेनेच्याच सर्वात जास्त जागा निवडून येणार असुन उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री असतील असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं. जालन्यात काल (१३ जून) पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कपाशी बियाणे आणि प्रत्येकी ७ हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मदतीचं वाटप करण्यात आलं होतं या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

पाच वर्ष मुख्यमंत्री कोण?

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

तसंच, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरणार आहे. जनतेनं आम्हाला जास्त जागा दिल्या तर आमचे पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतली कुणाला मुख्यमंत्री करायचे.आता तरी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री असणार आहे, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट करत आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितलं. काँग्रेस पुढील स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वबळ लढवणार ही आमची भूमिका आहे. कार्यकर्त्यांचीही तशी इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेत आहोत, असंही पटोले म्हणाले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर फटका काँग्रेस बसेल का यावर नाना पटोले म्हणाले की, जर ते दोन्ही पक्ष एकत्र आले तर पंढरपूर विधानसभा निवडणूक काय झाले हे लोकांनी बघितले. त्यामुळे काँग्रेसला असा काही फरक पडणार नाही’ असंही पटोले म्हणाले. हिंदू म्हणून राम मंदिर मदत केली होती. पैसे गोळा केले होते. लोकांच्या घराघरात जाऊन पैसे मागितले होते. ट्र्स्ट करत असेल तर ऑडिट मुद्दा काढला होता. पण आता या गैरव्यवहार पाहिला तर श्री राम नाव जपना, पराया माल अपना’ अशी खोचक टीकाही पटोलेंनी केली.

काय म्हणाले होते नाना पटोले?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखविल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.पटोले म्हणाले, ‘आता मघाशी अमानकर साहेबांनी म्हटलं की नानाभाऊंना मुख्यमंत्री करायचं आहे. मग हे कसं घडणार याच्यानंतर. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जाताना तुमच्या कलेक्टरला सांगून गेलो. यांनी अपील केली, मग झालं ना. मग कसं वाजवायचं हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही पाहिलं मला विधानसभेत. म्हणून तुम्हाला सांगतो सगळेजण एकजुटीने रहा. मुरलीधर राऊत तुम्ही खूप समाजसेवा केली. आता तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा सरळ. नानाभाऊंना मुख्यमंत्री बनवायचं आहे महाराष्ट्राचं. आपला माणूस आहे. तिथं कोण उभं आहे हे माहीत नाही. पण त्याच्याजवळून करायचं आपल्याला हे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही तर हे असंच फिरवत रहायचं. कारण त्याला कुणाला काही समजतच नाही ना. सगळ्यांचं दु:ख ज्याला समजेल तोच करेल की नाही. तुम्ही पाहिला ना माझा संयम.’

काय म्हणाले होते नाना पटोले?

आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे याबद्दल मला कल्पना नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोलेंनी आपल्या या वक्तव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं तर दाखवून दिलं नाही ना? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे. मात्र तिकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आघाडीसाठी प्रयत्न असल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत ताण तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केलीय. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं, भाजपचा हल्लाबोल

News Desk

कोल्हापुरी पायतानाच्या प्रसादानंतरही एखादी विकृत व्यक्ती…! मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका

News Desk

‘जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार’, गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका!

News Desk