HW News Marathi
महाराष्ट्र

अभिजित बिचुकले दोन्ही राजांना देणार आव्हान, साताऱ्यात उभारणार पॅनल

सातारा | बिग बॉस फेम अभिजित बिचूकले कायमच आपल्या वक्तव्यांमुळे किंवा अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. आताही पुन्हा ते चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे निवडणूकीचंच. अभिजित बिचुकले यावेळी थेट दोन्ही राज्यांना म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान देणार आहेत. सातारा पालिका निवडणूकीत बिचुकले उतरणार असून दोन्ही राजांना टक्कर देणार आहेत. अभिजित बिचुकले तर उदयनराजेंचें कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात पण आता त्यांनी यांच्या विरोधातच शड्डू ठोकला आहे.

माध्यमांशी बोलताना अभिजित बिचुकले असं म्हणाले की, मी व माझी पत्नी नगरपालिका लढत नाहीत. मात्र, माझी जी स्वाभीमानी वृत्ती आहे आणि माझा जो बाणा आहे त्या अनुषंगाने या नगरपालिकेतील राजकीय, प्रशासकीय भ्रष्टाचार मला बाहेर काढायचे आहेत. इथल्या नगरसेवकांची भाषा काय? इथले सत्ताधीश अध्यक्ष लोक लोणी खातात आणि सातारकरांचे नेते पवारांकडून पराभूत होतात. असं झालं तर अभिजित बिचुकलेकडून पराभूत झाले तर वावगं काय? मी शिव छत्रपतींचा वारसा जपतो आणि ही नगरपालिका माझ्या ताब्यात यावी इतकीच माझी अपेक्षा आहे, असं बिचुकले म्हणाले आहेत.

यावेळी बिचुकले यांनी स्वत: चे पॅनल उभारणार असं स्पष्टपणे सांगितलं. सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीच्या नेत्यांनी नगरपालिकेचे वाटोळे केले. यांच्या इच्छेने नगरसेवक निवडून तसे टेंडर घ्यायचे आणि वाटोळं करायचं. मी अभिजित बिचुकले स्वाभिमानी सातारकर विचारमंच अशा नावाने लवकरच माझ्या आघाडीची स्थापना करुन संपूर्ण नगरपालिका ताब्यात घेणार आहे. उदयनराजेंबाबत विचारलं असता बिचुकले म्हणाले की, त्यांना कळत नाही का? त्यांच्याच माणसांनी त्यांना लोकसभेला हरवलं”. यावर उदयनराजेंची किंवा शिवेंद्रराजेंची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचा विराट सभांचा विक्रम, आता कोकणावर स्वारी

News Desk

“….तर फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की तिलांजली…!सामना अग्रलेखातून केंद्र सरकारला सवाल!

News Desk

मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी मातोश्री बाहेर पडावं लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk