HW News Marathi
महाराष्ट्र

अभिजित बिचूकलेंना पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत चक्क १०० च्या वर पडली मतं!

पंढरपूर | संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीचा काल (२ मे) निकाल लागला. भाजपच्या समाधान आवताडेंनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव केला. दरम्यान, या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या आहेत दिग्गज नेत्यांनी प्रचार घेत सभा दणाणून सोडल्या होत्या. कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, या विजयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महविकस आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. या १९ उमेदवारांमध्ये बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता व विजयी होण्याबाबत विश्वास व्यक्त केला होता. पंढरपूर-मंगळवेढ्याची जनता मला साथ देईल व सध्या सुरू असलेल्या चूकीच्या राजकारणाला उत्तर देईल असं मत व्यक्त केलं होतं. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न त्याचप्रमाणे विठू माऊलीच्या नगरीत नेत्यांनी केलेली दूरअवस्था बघवत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आण्यासाठी मला ही पोटनिवडणूक लढवायची आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अभिजित बिचूकलेंनी उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची ही पहिली वेळ नव्हती. या आधीही बिचुकले यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजेंविरोधात सातारा मतदारसंघातून तर विधानसभेला युवासेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही वेळी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यंदाही डिपॉझिट जप्त होण्याची बिचुकलेंची परंपरा तशीच राहिली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत त्यांना केवळ १३७ मतं पडली आहेत. या निकलानंतर बिचुकलेंच्या पाठीशी पंढरपूर-मंगळवेढ्याची जनता खरचं होती का? अशी चर्चा मात्र राजकीय वर्तृळात रंगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शिका प्रकाशित, समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी

News Desk

‘राजीनामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला, ती पहिलीच वेळ असावी’ – संजय राठोड

News Desk

“पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?”, चित्रा वाघ यांचा राठोडांवर संताप

News Desk