मुंबई | बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनीदेखील कोरोनावर मात केली आहे. त्यानी स्वतः ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता कुटुंबातील सर्व जण कोरोनामुक्त झाले आहेत. तब्बल २९ दिवसांनंतर अभिषेक बच्चनला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
“वचन हे वचन असते. आज दुपारी माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी कोरोनाला हरवेन हे तुम्हाला आधीच सांगितले होते. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे धन्यवाद. तसेच नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांचाही मी सदैव ऋणी आहे, असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहे.
A promise is a promise!
This afternoon I tested Covid-19 NEGATIVE!!! I told you guys I’d beat this. 💪🏽 thank you all for your prayers for me and my family. My eternal gratitude to the doctors and nursing staff at Nanavati hospital for all that they have done. 🙏🏽 THANK YOU!— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) August 8, 2020
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एक एक करून बच्चन कुटुंबातील सदस्य कोरोनामुक्त होत गेले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.