HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यात शिवशाही-खासगी बसमध्ये धडक, ५० जण जखमी

सातारा | शिवशाही बस आणि खासगी बसमध्ये साताऱ्यातील पसरणी घाटात समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना पांचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.

एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बसच्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शिवशाही बस सेवा सुरू झाल्यापासून अपघाताचा आकडा जवळपास ५५० पार केला आहे. या अपघातांपैकी ५१ या आकडेवारीनुसार शिवशाही बसचा दररोज एक ते दोन अपघात होत असल्याचा अंदाज वर्तवला जातो. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान एकूण ४४२ अपघात झाले असून ४४ प्राणांतिक व ३०० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात

News Desk

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत! – मुख्यमंत्री

Aprna

महाविकासआघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही, केवळ कमाई करण्यावर भर!

News Desk