HW News Marathi
Covid-19

कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू

मुंबई | कोरोना रुग्णांना उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडतातना आता नवीन नियमावली बनविण्यात आली आहे. त्यानुसार सौम्य किंवा अति सौम्य कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना अवघ्या सात, आठ आणि नऊ दिवशी ताप नसल्यास दहाव्या दिवशी त्या व्यक्ती डिस्चार्ज देण्यात येणार आहे. केंद्राकडून राज्यातही कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी नवे नियम लागू करण्यास सांगितले आहे.

केंद्राच्या नियमानुसार, ज्या कोरोना रुग्णांना तीन दिवसांत ताप कमी झाला असेल तर पुढील चार दिवस ऑक्सिजनचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा जास्त असेल. या रुग्णांना १० दिवसांनंतर डिस्चार्ज देणार आहे. या रुग्णांना डिस्चार्ज करतांना पुन्हा कोविड चाचणीची गरज नाही. तसंच डिस्चार्जनंतर सात दिवस होम क्वॉरंटाईन करावे.

कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे आढळून न येता त्यांच्या कोविड चाचणीचा रिपोर्टही निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. या रुग्णांचा एक नमुना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. ही चाचणी कोविड लक्षणे नाहिशी झाल्यानंतरच करण्यात येईल. या रुग्णांना लक्षणे आढळल्यापासून डिस्चार्ज करेपर्यंतचा कालावधी किमान १० दिवस असावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन तेंडुलकरला कोरोना!

News Desk

राज्यात आज ११,०६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk

राज्यातील सिनेमागृह ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार

News Desk