HW News Marathi
Covid-19

काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई, पण मारहाण करणे चुकीचेच

मुंबई | राज्यात काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर राज्य सरकारकडून कारवाई केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी रेशन दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार झाले आहेत जे चुकीने आहे. हे प्रकार थांबले नाहीतर तर रेशन दुकानदारांना पोलीस संरक्षण द्यावे लागेल. याबाबत आपली महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. राज्यात काही ठिकाणांच्या रेशन दुकानदारांनी काळाबाजार केल्याचा घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, रेशन दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकारही तितकेच चुकीचे आहेत असे छगन भुजबळ म्हणाले.

काळाबाजार करणाऱ्या राज्यात रेशन दुकानदारांविरोधात १९ एप्रिलपर्यंत ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अनेक दुकानांचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत. राज्यात रेशन दुकानदारांसंदर्भात तब्बल १४ हजार तक्रारी आल्या असून त्यापैकी तब्बल ८ ते ९ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती देखील छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. त्यामुळे सरकारकडून अशा दुकानदाराविरोधात योग्य ती कारवाई केली जात आहे. त्यामुळे, दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. अन्यथा रेशन दुकानदारांना पोलीस संरक्षण देण्याची गरज भासेल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

एरवी आपण ३ लाख टन धान्यवाटप करतो मात्र आता ९ लाख टन धान्यवाटप होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळ यांनी पुढे म्हणाले कि, राज्यात साडेबारा कोटी लोकांपैकी साडेसात कोटी लोकांपर्यंत साडेतीन लाख टन इतके अन्नधान्य पोहोचवण्यात आले आहे. तब्बल ९५% लोकांना केंद्राकडून आलेला मोफत तांदूळ पोहोचवण्यात आला आहे. तर भगव्या रेशन कार्डधारकांना ३ कोटी लोकांना कमी दरात तांदूळ तसेच गव्हाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मुंबई, औरंगाबाद, नागपूर , अमरावती विभागात भगव्या रेशन कार्डधारकांना अन्न धान्यवाटप सुरू करण्यात आले असून १ मे नंतर नशिक तर 26 एप्रिलनंतर पुणे ग्रामीणमध्ये देखील सुरुवात करण्यात येणार आहे. डाळीचे देखील वाटप लवकरच सुरु करण्यात येईल असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना उपचारासाठी रुग्णालयाच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी सरकारचा ‘हा’ निर्णय

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी Twitter ने घेतला पुढाकार, 110 कोटींची केली मदत

News Desk

राज्यात आज ८,३०८ नवे रुग्ण, तर २५८ जणांचा झाला मृत्यू

News Desk