HW News Marathi
मनोरंजन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बच्चन यांनी आतापर्यंत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बहारदार अभिनयाच्या जोरावर बच्चन यांना आतापर्यंत अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या शिरपेचात दादासाहेब फाळके पुरस्कार आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्काराची घोषणा होताच सोशल मीडियावर बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरुवात झाली आहे.

‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. गेल्या ५० वर्षांमध्ये बच्चन यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार, बहुमानाने नावाजले गेले केले आहेत. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.

बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात. सध्या त्यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरू आहे, त्याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जंजीर, शोले, डॉन, त्रिशुल, अग्निपथ, ब्लॅक, सरकार, निःशब्द, चीनी कम, पा आणि पिकू यांसारख्या अनेक चित्रपटांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले.

प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “अभिनेते अमिताभ बच्चन मागील अनेक वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहेत. जवळजवळ दोन पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. त्यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देश तसेच देशाबाहेर असणारे अमिताभ यांचे चाहतेदेखील खूश होतील. त्यांना या पुरस्काराबद्दल खूप शुभेच्छा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीग बी अमिताभ गोत्यात!

News Desk

FLASHBACK 2018 : समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

News Desk