मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या सामना करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर उभे राहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर राज्यात कोरोनाविरुद्ध लढाई सुरू आहे. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळचे संकट महाराष्टातसमोर उभे ठेपले आहे. कोरोनासारख्या संकटाचा सामना सुरुवातीच्या काळात करणारा दुसरा मुख्यमंत्री कोणी नसेल, असे म्हणत बॉलिवूड अभिनेता अर्षद वारसी यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
I don’t think any CM has had to face such huge challenges right at the start of his term, as the @CMOMaharashtra. He barely settled in his office & had to deal with global pandemic in a crowded city like Mumbai and now a cyclone…🤦♂️
— Arshad Warsi (@ArshadWarsi) June 3, 2020
पुढील दोन दिवस घरातून बाहेर पडून नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी काल (२ जून) राज्यातील जनतेला संबोधित केले आहे. वारसीने ट्वीटमध्ये म्हणाले, “कोरोनासारख्या संकटाचा सामना सुरुवातीच्या काळात करणारा दुसरा मुख्यमंत्री कोणी नसेल. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यात कोरोनासारख्या महामारीचा सामना ते करत आहेत,” असे ट्वीट अर्षद वारसींने केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.