मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला आज (८ सप्टेंबर) NCB कडून अटक करण्यात आली आहे. थोड्याच वेळात म्हणजेच संध्या ४.३० वाजता रियाची मेडिकल टेस्ट होणार आहे. NCB कडून तब्बल ५ तास झालेल्या चौकशीनंतर आता रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला मिळालेल्या ड्रग अँगलच्या पार्श्वभूमीवर रियावर NCB कडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Process underway for Narcotics Control Bureau (NCB) to arrest Rhea Chakraborty in drug case related to #SushantSinghRajput's death probe.
— ANI (@ANI) September 8, 2020
NCB कडून सकाळी ९.३० वाजल्यापासून रियाची चौकशी सुरू होती. गेले २ दिवस रियाची तब्बल १० तास चौकशी झाली. दरम्यान, त्यानंतर आजच्या ५ तासांच्या चौकशीनंतर NCBच्या अधिकाऱ्यांकडून रियाला अटक करण्यात आली. त्यामुळे, आता NCB कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रत्येक आरोपीची कोव्हिड चाचणी केली जाते. यासाठी आता रियाला सायन रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.