नवी दिल्ली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर जाणं येणं बंद केलं होतं. पण काही देशांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध उठवले आहेत. अशा देशांमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता संबंधित देशात जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यावर क्वारंटाईन केलं जात आहे. सिरम इन्स्टिट्युटतर्फे उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड लस घेऊनही काही विद्यार्थ्यांना संबंधित देशामध्ये क्वारंटाईन व्हावं लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मदतीचा हात पुढे केला असून तब्बल १० कोटींची रक्कम या विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.
१० कोटींचा निधी बाजूला काढून ठेवला
अदर पूनावाला यांनी ट्विट करून हि माहिती दिली आहे. ट्विटमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे, त्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. “परदेशी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनो…काही देशांमध्ये अजूनही कोविशिल्ड लसीला परवानगी मिळालेली नाही. क्वारंटाईन न होता त्या देशात प्रवेश करण्यासाठी कोविशिल्ड लसीला संबंधित देशाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे अशा देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचा खर्च येतो. याचसाठी मी १० कोटींचा निधी बाजूला काढून ठेवला आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे”, असं अदर पूनावाला या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
Dear students travelling abroad, as a few countries are yet to approve COVISHIELD as an acceptable vaccine for travel without quarantine, you may have to incur some costs. I have set aside Rs.10 crores for this, apply below for financial support if needed. https://t.co/CbD6IsdKol
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 5, 2021
खर्चाविषयी चिंता व्यक्त केली
अदर पूनावाला यांनी बाहेर गावी जाण्याची चिंता व्यक्त केली असून त्यांचा अनुभव सांगितला आहे. “मी उच्च शिक्षणासाठी यूकेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईनमध्ये मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे. नव्या अंबर यादीतील नियमांप्रमाणे भारतीय विद्यार्थ्यांना यूकेमध्ये त्यांच्या निवडीच्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यांना यासाठी खर्च येऊ शकतो. मी त्यासाठी माझा वैयक्तिक १० कोटींचा निधी देऊ केला आहे”, असं अदर पूनावालांनी सांगितलं आहे. UnlockEducation या उपक्रमांतर्गत अदर पूनावालांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.