HW News Marathi
महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुपूर्द

मुंबई | काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अण्णासाहेब पाटील या आर्थिक मागास महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडे असलेले हे महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग करण्यात आलं आहे. नुकतंच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

“अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाऐवजी नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय ९ जुलै २०२० ला सारथी संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला होता. यानंतर हे महामंडळ कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडून हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अखेर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा संपूर्ण कारभार सर्व योजनांसह कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मी पुन्हा पुन्हा येईन”, राऊतांनी फडणवीसांना नाव न घेता डिवचलं

News Desk

ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरीही विद्यार्थ्यांना दिवाळीची सु्ट्टी मिळणार – वर्षा गायकवाड

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळ यांची माहिती!

News Desk