HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार ?

मुंबई । शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्यासाठी शिवडी, वरळी अशा मतदारसंघांची नावेही चर्चेत आली. यानंतर आदित्य ठाकरे वरळी मंतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले असून विधानसभा निवडणुकी येत्या ३ ऑक्टोबरला वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीच्या चर्चेने मुंबईतील शिवसैनिकमध्ये नव ऊर्जा निर्माण झाली आहे. आदित्य यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानिमित्ताने ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मात्र, आदित्य ठाकरे वरळीतूनच लढविणार हे जवळपास नक्की झाले. आदित्य यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने मुंबईतील शिवसैनिक विशेषत: युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी चांगलेच सक्रिय झाले आहेत. केवळ वरळीच नव्हे तर त्यांच्या सभोवतालच्या परिसर म्हणजे भायखळा, शिवडी माहीम या मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळाव्यांना वेग आला. स्वत: आदित्य यांनी यातील काही मेळाव्यांना संबोधित केले.

आदित्य ठाकरेसाठी सोशल मीडियावर मोहीम

‘युवासेनेने ‘हीच ती वेळ आहे, नवा महाराष्ट्र घडविण्याची’ अशी बॅनरबाजी आणि सोशल मीडियात मोहीमही सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सचिन अहिर यांच्यासह सहकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अहिर यांनी आदित्य यांना उमेदवारीची घोषणा करण्याचे आवाहन केले. आदित्या ठाकरेंच्या याबाबतचा निकाल स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच जाहीर करतील,’ अशी प्रतिक्रियार त्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंचे मंत्रीमंडळात पुनरागमन होणार- चंद्रकांत पाटील

News Desk

भारतात मुस्लिम नाही तर हिंदू व्होट बँक आहे अन् राहील, असदुद्दीन ओवैसींचे वक्तव्य

News Desk

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास करणार! – मुख्यमंत्री

Aprna