मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना शिवसेनेकडून जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. “ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी दिली नाहीत त्याची मनं जिंकायची आहे” या टॅगलाईनसह महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शुक्रवारपासून (१२ जुलै) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचून लोकांची मने जिंकण्यासाठी आयोजित केलेलीआदित्य ठाकरेंचा हा ‘जन आशीर्वाद दौरा’ विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन आदित्य ठाकरे यांच्या या ‘जन आशीर्वाद दौऱ्या’ला सुरुवात होणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ या टॅगलाईनसह १ ऑगस्टपासून महाराष्ट्रभर विकास यात्रा काढणार आहेत. राज्य सरकारने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यापूर्वीच म्हणजेच १२ जुलैपासूनच आदित्य ठाकरे यांच्या ‘जन आशीर्वाद दौऱ्या’ला सुरुवात होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.