HW News Marathi
महाराष्ट्र

“मुंबई महापालिकेत आदित्यसेनेची भ्रष्टाचाराची शृखंला सुरूच,” भाजपच्या आमदारचा आरोप

मुंबई | मुंबई महापालिकेत आदित्यसेनेची भ्रष्टाचाराची शृखंला सुरूच आहे. त्यामुळे आम्हीपण आमची ‘पोलखोलची ‘ मालिका सुरूच ठेऊ. आणि जनतेच्या हक्काचे पैसे लुबाडणारे काळे धंदे उघडे पाडू, असा इशारा आमदार अमित साटम यांनी दिला आहे. साटमांनी महापालिकेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेवर निशाणा साधला आहे. साटम म्हणाले, “मुंबई महापालिकेत आदित्यसेनेची भ्रष्टाचाराची शृखंला सुरूच आहे. त्यामुळे आम्हीपण आमची ‘पोलखोलची ‘ मालिका सुरूच ठेऊ. व यांचे जनतेच्या हक्काचे पैसे लुबाडणारे काळे धंदे उघडे पाडू. आदित्यसेना इतके दिवस काही खास कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी निविदा काढत असे, पण आता मात्र ऐनवेळी सिविसीच्या गाईडलाईन व नियमांमध्येच थेट मोडतोड करून टक्केवारीसाठी विदेशी कंपन्यांना मार्ग मोकळा केला गेला.”

 “इलेक्ट्रीक बस खरेदीच्या निविदा प्रक्रीया पार पडत असताना २५ एप्रील रोजी बिडींगची डेड लाईन संपण्याचा केवळ दिड तास आधी यांनी थेट निविदेची पात्रता अटच बदलून टाकली. एवढ्या घाईगरबडीत कुणाच्या फायद्यासाठी संपूर्ण नियमांची पायमल्ली केली जातेय. आणि यात स्पष्टपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर होतोय हे दिसतय. या सर्व प्रकारात प्रशासकीय अधिकारी इक्बालसिंग चहल व आदित्यसेना सामिल असल्यामुळे या महाभकास आघाडी सरकारकडने यांच्यावरती पायबंद घातला जाणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळेच मी सेंट्रल व्हिजीलन्स कमिश्नरकडे तक्रार दाखल केली आहे व या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती केली आहे, अशी मागणी साटमांनी केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत २ आयुक्त नेमण्याची कॉंग्रेसची मागणी, तर कॉंग्रेसचा डाव यशस्वी न होऊ देण्याचा भाजपचा इशारा

News Desk

‘वेळ आली तर शिवसेना भवन फोडू’, या विधानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

News Desk

पुण्यातील कंपनीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करणार – अजित पवार

News Desk