HW News Marathi
महाराष्ट्र

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई | राज्य सरकारने राज्यभरात १० हजार १ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या मेगाभरतीची जाहिरात आज(२८ फेब्रुवारी) प्रसिद्ध करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहीरात प्रदर्शित करण्यात आली. शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याच सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. यापैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परीश्रम करुन काम पूर्ण केले आहे. शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे. पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन चुका टाळता येतील असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण अनुयायांसाठी केले जाणार – धनंजय मुंडे

News Desk

सत्तेत राहून कामे करता येतात म्हणून शिवसेनेत प्रवेश | पांडुरंग बरोरा

News Desk

राज्य सरकारच्या आरोपांचे रश्मी शुक्लांकडून खंडन!

News Desk