HW News Marathi
महाराष्ट्र

संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट झाली हॅक

मुंबई | भारताच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. महत्त्वाच म्हणजे वायुदलाने लवकर चीन व पाकिस्तान विरूद्ध संयुक्त आघाडीवर लढणार असल्याची घोषणा केल्यावर ही घटना घडली.

संरक्षण खात्याच्या वेबसाईटवर अचानक चिनी अक्षरं दिसू लागली आहेत. दरम्यान संरक्षण खात्याने सगळं पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पण संरक्षण खात्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती या वेबसाईटवर असल्याने धोका वाढला आहे. पण ही वेबसाईट कुणी हॅक केलीय हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. चीन किंवा पाकिस्तानातून ही वेबसाईट हॅक झालेली असू शकते. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत आता संरक्षण खात्याची वेबसाईट पूर्वपदावर कधी येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

News Desk

‘भारत बंद’ला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा, बंदमध्ये सामील व्हा; जयंत पाटील यांचं आवाहन!

News Desk

‘नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा ठरली!’

News Desk
व्हिडीओ

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

News Desk

आपण नक्की कितपत सुरक्षित आहोत ? आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का? तुमच्या आमच्यासारख्या मुंबईकरांच्या रोजच्या जीवनात धावपळ हा फक्त शब्द राहिला नसून आयुष्य जगण्याची एक पद्धत बनला आहे. हि धावपळ करताना आपण अनेक वाहतुकीच्या अनेक साधनांचा उपयोग करतो त्यापैकी प्रवासासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी आणि वेळ वाचवणारी म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन.

हि लोकल ट्रेन आपल्याला सुरक्षितपणे आपल्या स्थानकांपर्यंत पोहचवेल अशी प्रवांशांची अपेक्षा असते. पण अशा काही घटना समोर येतात कि आपल्याला प्रश्न करायला भाग पाडतात.

अशावेळी काही महत्वपूर्ण प्रश्नानी तुमच्या मनात नक्कीच घर केले असेल,जसे की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आपण सुरक्षिततेचा विचार केव्हा करणार, ही सुरक्षितता फक्त रेल्वे सुरक्षा दलाची जबाबदारी आहे का ? आणि अशावेळी रेल्वेच्या आपत्कालीन चैन कितपत प्रभावी असतात, त्याचबरोबर

दोन स्थानकांच्यामध्ये घडलेला हा प्रसंग त्या महिलेसाठी जीवघेणा ठरू शकला असता, अशावेळी प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची ?

या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी जितके रेल्वे मंत्री पियुष गोयल बांधील आहेत तितकेच तुमच्या आमच्यासारखे सामान्य प्रवासीही हे प्रश्न उचलून धरण्यासाठी जबाबदार आहेत. तुमची सुरक्षा हि तुमच्याच हातात आहे, हे लक्षात घ्या आणि तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील तर आम्हाला संपर्क करा.

Related posts

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar

पेट्रोलच्या दरात चार वर्षातील विक्रमी वाढ, मुंबईकरांनी केला संताप व्यक्त

swarit

फडणवीसांनी आकडेवारी पहावी आणि हिशोब करावं; Praful Patel यांचा टोला

News Desk