HW News Marathi
Covid-19

संभाजीराजे छत्रपतींच्या मागणीनंतर ‘त्या’ ट्विटसाठी फडणवीसांनी मागितली माफी

मुंबई | लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काल (६ मे) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख चक्क ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा केला होता. फडणवीसांच्या या पोस्टवर सोशल मीडियातून प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली. सोशल मीडियावर #ShameOnYouFadnavis हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत होता. त्यानंतर फडणवीस यांनी जुनी पोस्ट डिलीट करून नवी पोस्ट टाकली. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज (७ मे) “देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी”, असे ट्विट केले. त्यानंतर, आता देवेंद्र फडणवीस यांनी आपला माफीनामा दिला आहे.

“छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीनंतर केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात आणखी एक पोस्ट केली आहे. “छत्रपतीं विषयी जेंव्हा केंव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेंव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेंव्हा केली गेली तेंव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजा मधील माझ्या चालू भाषणात जेंव्हा मला हे कळलं तेंव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तेंव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?”, असे संभाजीराजेंनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

फडणवीस यांच्या कालच्या ट्विटनंतर नेटिझन्सकडून मोठी टीका झाली. “शाहू महाराज हे राजे होते, ते छत्रपती होते, त्यांनी समाजसुधारणेचा आणि समाज प्रबोधनाचा पाया रचला मात्र म्हणून त्यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा करणे हा त्यांचा अपमान आहे. फडणवीसांनी याबाबत माफी मागावी”, अशी टीका या पोस्टवर झाली. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी केवळ जुने ट्विट डिलीट केले. मात्र, माफी मागितली नव्हती. फडणवीस यांनी ही आपली जुनी वादात सापडलेली पोस्ट डिलीट केल्यानंतर लगेचच एक नवी पोस्ट अपलोड केली. या नव्या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख “सामाजिक क्रांतीचे जनक वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन!” असा करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेची उमेदवारी डावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले

News Desk

महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

देशांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासांत ३५ हजारांच्यावर नवे रुग्ण

News Desk