HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेनंतर आता मनसेचा डोळा गुजराती मतांवर ….

मुंबई| आरटीओकडून मराठी नंबर प्लेट लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली जात असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट केला होता ,आता तेच मनसे आमदार राजू पाटील यांनी गुजराती समाजाच्या एका संस्थाकडून आयोजित रक्तदान शिबीर हजेरी लावली आहे. इतकेच नाही तर पुढच्या कार्यक्रमासाठी मदत देण्याचे आश्वासनही राजू पाटील यांनी यावेळी दिले आहे. डोंबिवलीत तरुण मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते

संस्थेकडून हा 100 वा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून डोंबिवलीत 26 वा रक्तदान शिबिर आज होता. या शिबीरात मोठय़ा संख्येने नागरीकांनी रक्तदान केले आहे. कोविडच्या पाश्र्वभूमीवर हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. भाजप शिवसेनेनंतर मनसेही गुजराती मतांवर डोळा ठेवला आहे. आत्ता परप्रांतीयांचा मुद्दा घेऊन चालणा:या मनसे आमदारांच्या उपस्थितीने चर्चेला एकच उधान आले आहे.

याआधी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून गुजराती बांधवांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. ‘मुंबई मे मा जलेबी ने फाफडा,उद्धव ठाकरे आपडा’ या टॅगलाईनच्या जोरावर गुजराती बांधवांना आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आणि मनसेसुद्धा आता त्याचं पाऊलावर पाऊल ठेवत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत दाखल होणार, पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेला अटक

News Desk

आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!

News Desk