HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसैनिकांचा मला जिवे मारण्याचा प्रयत्न!, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई। आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी काल मातोश्रीवर हनुमान चालिसा पठाण करणार होते. परंतु, राणा दाम्पत्यानी शिवसैनिक त्यांच्या खार निवासस्थान अडवून ठेवले होते. यामुळे राणा दाम्पत्याना मातोश्रीवर जाता आले नाही. या दाम्पत्यानी पत्रकार परिषदेत घेऊन आज (२४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौ-याचे कारण देते मातोश्रीवर हनुमान चालिसा पठाण करण्याचा निर्णय मागे घेतला. यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याना अटक केली. हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना. राणा दाम्पत्याना भेटीसाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी चप्पल आणि दगडफेक झाली. मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सोमय्यांनी म्हणाले, ” शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात एआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु, पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेतली नाही. पण पोलिसांनी माझ्याविरोधात बोगस एफआयआर दाखल केली. मला जिवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. याआधी वाशीम, पुणे आणि आता मुंबई मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस असताना ५० ते १०० शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी माझी एफआयआर दाखल केली पण यात कुठून तरी दगड आल्याचा म्हटले आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आता पुन्हा राज्य कसे काय गहाण टाकणार ? | अशोक चव्हाण

Gauri Tilekar

भागवत कराडांना अपमानित करणार नाही,कार्यकर्ते भेटीत पंकजा काय म्हणाल्या ?

News Desk

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

News Desk