HW News Marathi
Covid-19

उद्धव ठाकरे-शरद पवार यांची महापौर बंगल्यावर भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | देशातील दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आठवडा शिल्लक आहे. या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२७ एप्रिल) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढवा घेत लॉकडाऊन संदर्भाच चर्चा केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात काल रात्री महापौर बंगल्यात बैठक झाली. या बैठकीत राज्याची भविष्यात कोरोनासंदर्भातील कोरोनावरील उपायोजना आणि उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपालांच्या भूमिकेविषयीही चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस माननीय राज्यपाल महोदयांकडे करण्यात आली होती. सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने काल महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ची आता महाराष्ट्रात होणार निर्मिती ! 

News Desk

दिलासादायक ! राज्यात २४ तासांत ४० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त

News Desk

राज्यात पुन्हा एकदा एका दिवसात १० हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळले

News Desk