मुंबई | उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आपल्या कुटुंबासमवेत या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे यांना शपथ घेतल्यानंतर त्यांच्या काकू-मावशी आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. याक्षणी कुंदाताईंना आनंदाश्रू अनावर आले नाही. यावेळी कुंदाताई भावूक झालेल्या दिसल्या.
“छत्रपती शिवजी महाराजांना वंदन करून, आणि माझ्या आई-वडीलांना स्मरण करून, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल श्रद्धा व खरी निष्ठा बाळगीन, मी भारताची. सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन.”
विधानसभा निडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महिनाभर संघर्ष सुरू होता. यानंतर अखेर महाविकासआघाडीचे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व करणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.