HW News Marathi
महाराष्ट्र

गोकूळचा हा विजय जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांचा ! सतेज पाटलांनी मानले आभार

कोल्हापूर | गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून सतेज पाटील यांनी हा विजय खेचून आणला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून गोकुळ दुधसंघावर महाडिक गटाची सत्ता होती. मात्र, आता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ही सत्ता मिळवली आहे. या दोन्ही नेत्यांनी खरंतर गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा निर्धारच केला होता. गोकुळमध्ये परिवर्तन होणार याची जोरदार चर्चा राज्यभर रंगली होती. अखेर सतेज पाटील गटाला ते साध्य झाले आहे. दरम्यान, या मोठ्या यशानंतर आता सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “गोकूळचा हा विजय जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांचा आहे”, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले सतेज पाटील ?

गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर सतेज पाटील म्हणाले कि, “कै. आनंदराव चुयेकर साहेबांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या १७ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच हा संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती देण्यासाठी गेली ६ वर्ष संघर्ष करणाऱ्या सर्वांचेच मनापासून आभार! आज खऱ्या अर्थाने गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती गेला. जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या अपेक्षेप्रमाणे गोकुळ दूध संघ चालविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

Manasi Devkar

कसब्यात ‘मविआ’चे रवींद्र धंगेकर यांचा विजय; 28 वर्षानंतर ‘भाजप’चा पराभव

Aprna

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

News Desk