HW News Marathi
Covid-19

अहमदनगरमध्ये कोरोना निगेटिव्ह असलेले रुग्ण निघाले पॉझिटिव्ह

अहमदनगर | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताच आहे. अहमदनगरमधील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. कारण कोरोनाते निगेटिव्ह असलेले ४ रुग्ण १४ दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण उडाली आहे. संगमनेर शहरातील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे रिपोर्ट १४ दिवसांपूर्वी निगेटिव्ह आले होते. आता एकाच दिवशी हे चौघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे.

नेपाळला गेलेल्या १४ जणांची चाचणी केली असता, त्यापैकी चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा शल्यचिकीत्सक प्रदिप मुरंबीकर यांनी याबाबतची माहिती दिली. ‘संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३७वर पोहोचली आहे. आतापर्यंत २० जणांना डिस्चार्ज दिला आहे तर कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे’, अशी माहिती नगर जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती शासन लागुकरण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका !

News Desk

खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? – राज ठाकरे

swarit

प्लाझ्मा थेरेपीबाबत जनतेने सावध राहावे !

News Desk