HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगरमध्ये आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्राचा आकडा १९८ वर

अहमदनगर | महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तासागणिक वाढ होत आहे. अहमदनगरमध्ये आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे दोघे परदेशी नागरिक असून, पहिली व्यक्ती फ्रान्स दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्टची आहे. या दोन रुग्णांबद्दल माहिती जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी दिली आहे.

हे दोघेही परदेशी नागरिक नगरमध्ये कामानिमित्त आले होते. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ९ जणांनाही प्रशासनाने ताब्यात घेतले असून, त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी ३ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोबाधितांचा आकडा ५ वर गेला आहे. या ५ पैकी एक रुग्ण बरा झाला असून आजच (२९ मार्च) त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, नगरमध्ये मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पहिला कोरोनाबाधित आढळला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते आणि परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ते कसून तपासणी करत होते. त्यामूळेच परदेशी नागरिक असलेल्या या दोघांची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह निघाले. आता या दोघांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले असून दोघांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना म्हणजे भाजप आयटी सेल, सचिन सावंतांचा गंभीर आरोप

News Desk

OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार; फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात !

News Desk

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यास पाठपुरावा करणार! – सतेज पाटील

Aprna