HW News Marathi
देश / विदेश

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

मुंबई | “आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत,” असे वादग्रस्त वक्तव्य ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रवक्ता वारीस पठाण यांनी केले आहे. या प्रकरणी मुंबईतील अंधेरी येथे वारीस पठाणवर तक्रार दाखल करण्यात आला आहे. पठाणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली. यानंतर पक्षाकडून पुढील आदेशापर्यंत पठाण माध्यमांना बोलण्यास बंदी घातली आहे.

अन्याय आणि भ्रष्टाचार विरोधी लढणारे ज्वलंत संघटना यांची अध्यक्षा पृथ्वीराज मस्के यांनी पठाणांविरोधात अंधेरी पोलीस स्थानकात त्यांच्या वादग्रस्त विधानावर तक्रार दाखल केली आहे. देशद्रोही असून देशात हिंदू आणि मुस्लीममध्ये द्वेष निर्माण करणारे पठाणांचे विधान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनेने अंधेरी पोलसी स्थानकात केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत शाहीन बागमध्ये देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पठाणांनी वारीस पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये शनिवारी (१५ फेब्रुवारी) जाहीर सभेतील भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

वारीस पठाण नेमके काय म्हणाले

“स्वातंत्र्य घ्यावे लागेल, आणि जी गोष्ट मागितल्यावर मिळत नाही. तर ती हिसकावून घ्यावी लागणार आहे. हे तुम्ही लक्ष्यात ठेवा. आम्हाला म्हणाले की, तुम्ही तुमच्या माता, भगिनींना पुढे केले, आता फक्त वाघिणी बाहेर पडल्या आहे तर तुम्हाला घाम फुटला. मग तुम्ही समजून जा, जेव्हा आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल. आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींनाही भारी आहोत, असे ते म्हणाले. या जाहीर सभेत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘निशान इज्जुद्दीन’ सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले

News Desk

संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार की माघार घेणार?, उद्या घेणार पत्रकार परिषद

Aprna

सेल्फ कोरोंटाईन करताना या बाबी ठेवा लक्षात

swarit