HW News Marathi
Covid-19

अजित पवार आणि राजेश टोपे इन अ‍ॅक्शन मोड, दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा करणार दौरा

श्रीवर्धन | राज्यात हळूहळू कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, अजूनही काही जिल्ह्यांत, ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या अधिक आहे. राज्यातील अशा जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे त्या जिल्ह्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे दौरा करणार आहेत. पवार आणि टोपे दर आठवड्याला या कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तशी माहितीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवार आज (४ जून) श्रीवर्धनला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, त्या जिल्ह्यांना दर आठवड्याला मी आणि राजेश टोपे भेट देणार आहोत. या जिल्ह्यांना भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करणार आहोत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

तिसरी लाट रोखण्याचा सरकारचा प्रयत्न

राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसरी लाट येऊ नये, पण आलीच तर त्याचा मुकाबला करता यावा म्हणून आम्ही कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच टक्के आहे. किंवा त्यापेक्षा कमी आहे. तिथे आम्ही सुविधा देणार आहोत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि वर्धा येथे ही टक्केवारी दहा टक्के आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आरोग्य सुविधांची कमतरता आहे का? याची चौकशी केली जात आहे. सुविधा दिल्या दिल्या जाणार आहेत, असं ते म्हणाले आहेत.

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनवरील जीएसटी हटवा

म्युकरमायकोसिसच्या आजाराने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन खूप महागडे आहे. त्याबाबत केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीकडे या इंजेक्शनचा जीएसटी कमी करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शिवराज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा

यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. शिवराज्याभिषेक दिन घरीच साजरा करा. सणांपेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा आहे, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LockDown4 : देशभरात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

News Desk

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

News Desk

आज तीन रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला कोरोना मुक्त

News Desk