HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली-अजित पवार

मुंबई | खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी स्वागत केले आहे.

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. माननीय खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये  हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या  ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास अजित पवार यांनी दिला आहे.

Related posts

मागासवसर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करणार  – रामदास आठवले

News Desk

नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी

News Desk

२० लाखांचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्था मंदावलेलीच, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk