मुंबई। टोक्यो येथील पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिला टेबल टेनिसचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेले ऑलिंपिक पदक देशातील युवकांना, दिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडविण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
टोकियो येथील पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिला टेबल टेनिसचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेल यांचं मनःपूर्वक अभिनंदन! आज राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेलं हे ऑलिम्पिक पदक देशातील युवकांना,दिव्यांग बंधूजनांना क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी घडवण्यासाठी प्रेरणा देईल,असा विश्वास आहे. pic.twitter.com/WBrcjvT3vS
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 29, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भाविनाबेन पटेल यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, खडतर परिश्रमांतून देशाला ऑलिंपिक रौप्यपदक जिंकून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ऑलिंपिक रौप्यपदक जिंकण्याचा चमत्कार घडवला आहे. त्यांचं यश हे देशाचा गौरव वाढवणारं आणि देशवासीयांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भाविनाबेन पटेल यांचं कौतुक केलं आहे.
भारताला रौप्य पदक
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला प्रथम यश मिळालं आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.
कोण आहे भाविनाबेन पटेल?
तेरा वर्षांपूर्वी भाविनाने अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. भाविना व्हीलचेअरवर बसून खेळते. बाराव्या वर्षी तिला पोलिओ असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने खचून न जाता भविनाने दमदार वाटचाल केली आहे.
2011 मध्ये भाविनाने थायलंड इथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. 2013मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाविनाने रौप्यपदक पटकावले होते. भाविनाने जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेतला, पदकं मिळवली. पण सुवर्ण पदक मात्र कायम तिला हुलकावणी देत राहिले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.