HW News Marathi
Covid-19

पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार का?, पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकीला सुरूवात

पुणे | राज्यात कोरोना संख्या वाढत चालली आहे. अर्थात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याबळ वाढत आहेच. मात्र, बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता वाढत आहे. मुंबईत काही अंशी कोरोना आटोक्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत नसेल, तर पुण्यासह अन्य शहरांतही १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक सुरू आहे. त्यामुळे पुण्यात लवकरच कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार आज (७ मे) पुण्यात असून ते विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात लॉकडाउन लावायचा की नाही यावर चर्चा होत आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळेच तो आटोक्यात येत आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबई शहरात तो आटोक्यात आणण्यात यश प्राप्त केले आहे. त्यांचा पॅर्टन वापरा. पुण्यासारख्या शहरात तो आटोक्यात येत नसेल, तर पुण्यासह अन्य शहरांतही १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा

News Desk

#Coronavirus : राज्याचा आकडा २३४०१, आज ५८७ कोरोनामुक झाले

News Desk

नागपूरमध्ये २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन, पालकमंत्री नितिन राऊत यांची घोषणा

News Desk