HW News Marathi
महाराष्ट्र

‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – अजित पवार

मुंबई | कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केली.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यशासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून शरद पवारसाहेबांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास बैठकीत व्यक्त केला. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील ५०-१०० वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.

कोकणातील तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आजची बैठक होत आहे. तिन्ही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पर्यावरणाचा ऱ्हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून साधला जाणार आहे तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘इनोव्हेशन’ क्षेत्राचा विकास होण्यासाठी हे राजकीय बंधन आणि दबावापासून मुक्त असले पाहिजे.त्यासाठी राज्याचे धोरण आवश्यक असल्याचेही सांगितले.

‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भातील मुद्दे

इनोव्हेटीव्ह रिजन अंतर्गत रायगड, रत्नागिरी, सिंधुदु्र्ग जिल्ह्यांचा समावेश…

कोकणात गुणवत्ता असल्याने विकासाची अमर्याद संधी…

कोकणातील साधनसंपत्तीचा उपयोग करुन पर्यावरणपुरक उद्योगांचा विकास…

पर्यावरण व आर्थिक क्षेत्राचा एकत्रित शाश्वत विकास…

उद्योग, विद्यापीठ व संशोधन केंद्रांच्या सहभागातून ज्ञानाधारित समाजाची निर्मिती…

नागरिकांच्या जीवनपद्धतीत व आनंद निर्देशांकात वाढीचे ध्येय…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींनी इथेनॉल निर्मिती करावी, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला

News Desk

इतक्या लाटा आल्या तरीही शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला राखला !

News Desk

 ‘अनाथांची माय’ काळाच्या पडद्याआड! सिंधुताई सपकाळ यांचं निधन, सर्व स्तरांतून मोठी हळहळ

Aprna