HW News Marathi
Covid-19

पुन्हा मागच्या सारखा लॉकडाऊन करावा लागेल, अजित पवारांचा गंभीर इशारा!

पुणे | महाराष्ट्रात पुन्हा कोरोनावर उद्रेक झाला आहे. मुंबई, पुण्यातही प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यातले वाढत्या कोरोनावरुन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना सहकार्य करत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. लोकांनी सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव मागच्यावेळी लावला तसा कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा दमही त्यांनी नागरिकांना दिला आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. ते पुण्यात कोरोनाच्या जिल्हा प्रशासनासोबतच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

“पुणेकरांनी मागच्यावेळी शनिवार रविवारच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा मी पण त्यांचं कौतुक केलं. आता यावेळीही शनिवार रविवार दोन दिवस पुणेकर हीच गोष्ट दाखवतील. एकंदरित मागच्यावेळी लॉकडाऊन होतं तेव्हा बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यावेळी आपण खूप मोठा काळ थांबलो”.

“मात्र, दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा कोरोना बाधितांची संख्या वाढलीय. त्यामुळे कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची वेळ आली. म्हणूनच नागरिकांना सहकार्याची भूमिका घ्यावी. माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सांगितलंय की दोन दिवसांचा लॉकडाऊन पाळला नाही तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रांतीयांना आपापल्या राज्यात जाण्याकरता नोडल अधिकाऱ्यांकडे फॉर्म भरुन द्यावा लागणार

News Desk

मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशात २ किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा उल्लेख नाही

News Desk

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपयांचे वितरण सुरू

News Desk