HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत उभारणार ‘मुंबई आय’

मुंबई | मुंबईत आज (१५ जानेवारी) मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी नवीन सुरु करणाऱ्या योजनाबद्दल आणि प्रकल्पांबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. इंदु मिलच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधणार असून त्याची उंची ४५० फूट इतकी असणार आहे.

तसेच लंडनमधील लंडन आय जसे प्रसिद्ध आहे तसेच मुंबईत मुंबई आय बांधण्याचीही संकल्पना त्यांनी मांडली. हे मुंबई आय बांधण्यासाठी बांद्रा-वरळी सी-लिंक उतरल्यावर उजवीकडे जी जागा आहे ती वापरण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान या संबंधी CRZ ला या प्रस्तावाशी काही अडचण नसल्यास मुंबई आय बांद्रा-वरळी सी-लिंकच्या जवळ असलेल्या भुखंडावर उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूर्वी ‘चिडी’चा डाव खेळायचे, आता ‘ईडी’चा डाव खेळतात !

News Desk

शरद पवारांचा खडसेंच्या भेटीवर खुलासा!

News Desk

कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

News Desk