पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी तुम्ही तुमची मुलं काय ट्विट करतात हे पाहता किंवा विचारतात का? असा प्रश्न विचारला आहे. यातून त्यांनी आपण पार्थ पवार यांच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नसल्याचंच सूचकपणे सांगितलं आहे. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केल्याचंही म्हटलं. ते आज (२ ऑक्टोबर) पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले असता बोलत होते.
“पार्थने जे ट्विट केलं त्यावर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे. तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता किंवा विचारता का?” अशा खरमरीत भाषेत अजित पवारांनी उत्तर दिले आहे. दरम्यान, या आधी देखील शरद पवारांनी जेव्हा पार्थ यांना फटकारले होते त्यावर देखील अजित पवारांनी काहीही बोलणे टाळले होते.
काय केले पार्थ यांनी ट्विट?
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी.
विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.
Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. pic.twitter.com/r8c3YQUoO0
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.