HW News Marathi
महाराष्ट्र

“मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा”   

पंढरपूर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार केला. यावेळी भाषण करताना अजित पवारांना “मास्क काढा” (Mask) असं लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं मिश्कील भाष्य केलं. दरम्यान, आज अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पंढरपुरात भाषणादरम्यान चिठ्ठीपंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवार बोलायला उभे राहिले. अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर “मास्कमुळे आवाज येत नाही, दादा मास्क काढा” असं लिहिलेलं होतं. कार्यकर्त्याने पाठवलेली ही चिठ्ठी अजित पवारांनी भरसभेत जाहीर वाचून दाखवली. “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा म्हणून” असं अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला होता.

भारतनानांचे अधुरे स्वप्न भगीरथ पूर्ण करेल”

“पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना (दिवंगत आमदार भारत भालके) निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन” अशी हमी अजित पवारांनी दिली.

अजित पवारांचे पांडुरंगाला साकडे

“हे पांडुरंगा राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर” असं म्हणत अजित पवारांनी पांडुरंगाला साकडे घातले. “कोरोना राज्यात वाढलाय. त्यासाठी नियम पाळावे लागतायत. कोरोना नियंत्रणसाठी केंद्राने लस द्यायला पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत. भाजप हा ग्रामीण भागात फारसा लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे आहेत, हे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे. काळानुतरुप नवीन लोकांना संधी द्यावी लागते” असंही अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार

News Desk

शरद पवारांचा खडसेंच्या भेटीवर खुलासा!

News Desk

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार! – डॉ. जितेंद्र आव्हाड

Aprna