HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगावच्या त्या वक्तव्यावरून कन्नडिगांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला

बेळगाव | कन्नडिगांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी कन्नडिगांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला आहे. अजित पवार यांनी काल (१७ नोव्हेंबर) ट्विटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहत असताना संयुक्त महाराष्ट्राची स्थापन करु, असं म्हटलं होतं. याच वक्तव्याचा राग मनात धरुन प्रो कन्नडा ग्रुपने अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (१७ नोव्हेंबर) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी त्यांनी “बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया”, असं वक्तव्य केलं होतं. मात्र, या वक्तव्याला प्रो कन्नडा ग्रुपने विरोध केला आहे. अजित पवार यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी कन्नडा ग्रुपने केली आहे.

बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली ६२ वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या लढाच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. मात्र, कन्नडिगांची दादगिरी सध्या वाढताना दिसत आहे. काळ्या दिनादिवशी देखील याचा प्रत्यय आला होता. काळ्या दिनादिवशी मराठी बांधवांनी शांतपणे कार्यक्रम केले. मात्र, काही कन्नड संघटनांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कन्नडिगांनी महाराष्ट्राच्या एसटी बस फोडण्याचा प्रयत्न केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे नेत्यांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; आंदोलकांना बुलढाण्यातून बाहेर काढण्यास सुरुवात

Aprna

पुण्यात सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरु….

News Desk

“वरुण सरदेसाई आता आला, तर माघारी जाणार नाही” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ईशारा!

News Desk